वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, नाशिकसह जिल्ह्यात अपघातांच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा परिसरात असताना दिंडोरीकडे येणारी पिकअप आणि अल्टो कार यांची समोरासमोर जोरदार धडक बसली. त्याचवेळी पिकअपच्या मागून येणारी मोटरसायकल अल्टो कारला येऊन धडकली.
अपघातात प्राध्यापक शिंदे यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागला. त्याचबरोबर पिकअप चालक सागर पेलमहाले आणि विठ्ठल पागे हे सुद्धा जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्राध्यापक शिंदे यांना जबर मार लागल्याने आणि रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
प्राध्यापक रामदास शिंदेवणी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. कार्यकाळ संपल्याने ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी शिंदे हे नाशिकवरुन वणीकडे आपल्या अल्टो कारने निघाले होते. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment