बीड बसस्थानकातील कँटीनमध्ये ग्रामीण भागातून आलेला, अपंग व्यक्तीने चपाती भाजी खाल्ली. मात्र माझ्याकडे बिल देण्यासाठी पैसे नाहीत. असं म्हणून त्या ग्राहकाने वेटरला हात जोडून विनंती केली. यावर वेटरने त्या ग्राहकाच्या कानशिलात लगावली. एवढ्यावरचं हे थांबले नाही तर त्याला धरून ओढत आणत बेंचवर पाडले. त्यानंतर त्याच्या खिशाची तपासणी करून खिशातील पैसे काढले अन काऊंटरकडे ओढत नेत भिंतीवर देखील पाडलं. ही घटना साधारण 4 दिवसापूर्वीची असून घडलेला या सर्व घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
दरम्यान सदरील ग्राहक हा अपंग आहे. पैसे नाही म्हणत असतांना त्याला मारहाण करून पैसे घेतले, त्यानंतर परत त्याला भिंतीवर पाडलं. त्यामुळं एका अपंग व्यक्तीचे 2 चपाती आणि भाजीचे पैसे न देण्याचे कारण काय होते ? हे माहीत नसले तरी या बसस्थानकाच्या कँटीनमधील घटनेने संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळं या कँटीनमध्ये प्रवाशांना व्यवस्थित सेवा दिली जातेय का ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून त्या मारहाण करणाऱ्या वेटर अन मालकावर कारवाई करावी. अशी मागणी केली जात आहे.
No comments:
Post a Comment