Monday, April 10, 2023

महात्मा फुले यांच्या विचारांची प्रासंगिकता.

            

आधुनिक भारतातील पहिले समाज क्रांतिकारक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले होत त्यांनी बहुजन समाजाला पददलीत जनतेला आणि शूद्र अतिशूद्रांना सनातन्याच्या धार्मिक दाशातून मुक्त करण्यासाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत आपला देह झीजविल. जो धर्म माणसाला माणुसकीची वागणूक देत नाही माणसा माणसांमध्ये भेदाभेद निर्माण करतो एकाला श्रेष्ठ व दुसऱ्याला कनिष्ठ लेखतो तो धर्मच मी मानत नाही. असे महात्मा फुले म्हणत. सामाजिक विषमते विरुद्ध ज्योतिरावांनी एल्गार पुकारून समतेसाठी  शुद्राती शुद्रांना संघटित करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. याच काळात ज्योतिरावांनी शिवाजी महाराज यांचे चरित्र, जॉर्ज वॉशिंग्टन यांचे चरित्र, थॉमस पेन यांचा राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचे अध्ययन केले या ग्रंथातील मानवी समतेच्या विचारांनी त्यांच्या मनात मानवी स्वातंत्र्य, समता यांचे विचार चक्र सुरू झाले .महात्मा फुले यांच्यावर *गौतम* बुद्ध ,संत कबीर ,महात्मा बसवेश्वर संत तुकाराम, येशू ख्रिस्त,थॉमस पेन आदी अनेक श्रेष्ठ विचारवंतांच्या विचारांचा प्रभाव पडला. *जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले साधू तोची ओळखावा देव तेथेच जाणावा* या संत तुकारामाच्या ओवीचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम रुजला होता व त्या अनुषंगाने फुले यांनी स्वतः कार्य करण्याचे ठरविले दिन दलितांचे अश्रू पुसण्याचे काम त्यांनी हाती घेतले.अशातच ज्योतिरावांचा त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात केवळ शूद्र असल्याने झालेला अपमान त्यांच्या अतिशय जिव्हारी लागला होता. या घटनेने त्यांच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले.एकदा कार्याची दिशा निश्चित झाल्यावर ज्योतिरावांनी मागे वळून कधीही पाहिले नाही. ते ध्येयापासून विचलित झाले नाहीत. विद्ये शिवाय तरुनोपाय नाही हे त्यांनी अचूक ओळखले होते.  *विद्या हे शस्त्र आहे भारी धरिले ज्यांनी तिला उरी     त्यांनी घेतली गगनापरी उंच भरारी* त्यांच्या काळात सनातनी धर्म मार्तंडानी आणि सर्व समाजाने स्त्रीला सर्व प्रकारचे हक्क नाकारले होते. स्त्रियांना त्यांचे हक्क प्राप्त व्हावेत यासाठी मोठ्या प्रमाणात ज्योतिरावांनी जागृती घडून आणली त्यांना हक्क मिळण्याचे एकमेव माध्यम म्हणजे शिक्षण आहे हे त्यांनी वेळीच ओळखले होते हा त्यांचा शैक्षणिक विचार आजच्या काळात प्रासंगिक वाटतो.प्रतिकूल परिस्थितीतही ज्योतिरावांनी 1 जानेवारी 1848 रोजी पहिली मुलींची शाळा सुरू केली.अशा विविध शाळा मुलींसाठी त्यांनी पुढील काळामध्ये स्थापन केल्या. ज्योतिराव फुले यांना अनुभवाने खूप शिकवले *तत्कालीन शिक्षणाची स्थिती दिशा* व पद्धती याविषयी त्यांनी खूप चिंतन केले त्यावेळेसच शूद्र अति शूद्र बहुजन समाज दारिद्र्यात खितपत पडला होता. *भाकरी की शिक्षण या प्रश्नाला भाकरी असे उत्तर देणारा होता*. या समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा न्यायची असेल तर त्यांच्या रिकाम्या वेळातच त्यांना शिकवावे लागेल. हे जाणून त्यांनी रात्रीच्या शाळा सुरू केल्या. ज्योतिरावांच्या शिक्षणातील मूलगामी व समाज उपयोगी कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन इंग्रज सरकारने फुले दांपत्याचा 16 नोव्हेंबर 1852 रोजी पुणे येथे प्राचार्य मेजर कॅन्डी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात भव्य सत्कार करण्यात आला होता. पालकांनी मुलांना वाचनाची आवड लावली पाहिजे, असे सातत्याने ज्योतिराव म्हणत असत वाचनातूनच शांत होते आणि माणूस विचार करू लागतो असे सांगताना ते म्हणतात *थोडे दिन तरी मध्यवर्ज करा तोच पैसा भरा ग्रंथासाठी ग्रंथ वाचताना मनी शोध करा देऊ नका थरा वैरभावा* इंग्रज सरकारने 1856 मध्ये केलेल्या विधवा पुनर्विवाह कायद्याचे ज्योतिरावांनी जोरदार समर्थन केले .आपल्या लेखणीच्या व भाषणाद्वारे पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. पुणे येथे गोखले बागेत एक पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला हे आजच्या काळात सुद्धा पुनर्विवाह घडणे आवश्यक आहे म्हणून या विचाराची प्रासंगिकता आजही असलेली दिसून येते. विधवा पुनर्विवाहाचा कायदा झाला असला तरी तत्कालीन कर्मठ समाजाच्या पचनी  पडणे अवघड होते. समाजात विधवाची संख्या लक्षणीय होती.म्हणून त्यांना पुन्हा विवाह करता यावा यासाठी जनजागृतीची मोहीम त्यांनी हाती घेतली.  त्याचबरोबर चुकून वाकड पाऊल या विधवांचे पडल्यानंतर त्यांची धीड काढण्यात येत असे.अशा अभागी स्त्रियांची या अवस्थेतून सुटका व्हावी म्हणून 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले.ज्योती रावांचा बहुपत्नीत्वाला विरोध होता. ज्योतिबा सावित्रीबाई दाम्पत्याला मूळ बाळ नव्हते.त्यामुळे ज्योतिरावांच्या नातेवाईकांनी त्यांना दुसरा विवाह करण्याचा आग्रह केला होता, पण *बोले तैसा चाले* या उक्तीप्रमाणे ज्योतिबांनी नातेवाईकांच्या आग्रहाला बळी पडले नाहीत व बालहत्या प्रतिबंधक ग्रहातील काशीबाई नावाच्या ब्राह्मण स्त्रीच्या मुलाला दत्तक घेतले व त्याचे नाव यशवंत ठेवण्यात आले ज्योतिरावांचे समाजाला संजीवनी देण्याच्या बाबतचे शैक्षणिक धोरण हे नक्कीच आजही मोठ्या प्रमाणात प्रेरणादायी स्वरूपाचे आहे .*अग अज्ञान बाहेर काढ घर गिळाया बसलं तुझ्या पोरीला शाळेत धाड शिक्षण मिळायला लागलं.                   पूर्वी शिक्षण घेण्याची होती स्त्रियांना बंदी ज्योतिरावाच्या कृपेने आज मिळाली संधी तरीही काग मन तुझं मग वळाया लागलं तुझ्या पोरीला शाळेत धाड शिक्षण मिळायला लागलं                                    आज कितीतरी महिला शिकून पुढे गेल्या मोठ्या पदावर विराजमान झाल्या            शिक्षणाचे महत्व ज्योतिरावांमुळे कळाया लागल तुझ्या पोरीला शाळेत धाड शिक्षण मिळाया  लागल* ज्याप्रमाणे पुरुष आपला स्वतःचा विकास शिक्षण घेऊन साध्य करू शकतो त्याप्रमाणेच स्त्रिया देखील स्वतःचे जीवनमान शिक्षणाद्वारे घडवून उंचवू शकतात असे स्पष्ट मत महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या शैक्षणिक व सामाजिक उद्धारासाठी मांडले व त्या संदर्भात भरीव असे कार्य शेवटपर्यंत केले. स्त्रियांना पुरुषांच्या जुलमी बंधनाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. सामाजिक हितासाठी सुद्धा ज्योतिरावांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.समाजातील अपप्रवृत्तीच्या विरुद्ध  संघर्ष करून शूद्र अति शूद्र यांच्यामध्ये सुधारणा करून न्याय हक्कासाठी जागृत करण्याचे कार्य चालू असताना त्यांनी सामान्य जनतेला समजेल अशा भाषेत जनजागृतीसाठी व लोकप्रबोधनासाठी साहित्याची निर्मिती केलेली दिसून येते. त्यामध्ये *तृतीय रत्न नाटक छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा ब्राह्मणांचे कसं गुलामगिरी शेतकऱ्यांचा असून सत्सार एक,सत्सार क्रमांक दोन इशारा, सत्यशोधक    समाजोक्त मंगल अष्टका सह सर्व पूजा विधी सार्वजनिक सत्यधर्म हंटर आयोग निवेदन यांचा समावेश आहे* ज्योतिबांचे साहित्य हे लोक भाषेत आहे. या साहित्याचा मुख्य हेतू  स्त्रिया व इतर बहुजन समाज यांच्यामध्ये सुधारणा व्हावी हाच असलेला दिसून येतो. म्हणून हाही विचार आजच्या काळात रुजणे गरजेचे आहे.असे मला वाटते. किसान ,श्रमजीवी यांच्या बहुसंख्य गरजा अशा आणि आकांक्षा यांचे प्रतिबिंब या साहित्यामध्ये अधोरेखित केलेले दिसून येते. म्हणूनच ज्योतिबांना  लोकसाहित्याचे अध्य मानकरी संबोधले जाते. *मानवता हा एक समान बंधन तत्वाचा धागा सर्व विश्वातील माणसा माणसात घट्ट करावा आणि विश्व मानवता आणि विश्व कुटुंब ही संकल्पना अस्तित्वात यावी याचा त्यांनी मोठ्या प्रमाणात ध्यास घेतला होता*. शुद्राति शूद्र जाती एकाच कुळातील आहेत. महार मांग चांभार मराठा कुणबी धनगर माळी साळी कोळी व बारा बलुतेदार सोनार शिंपी लोहार कुंभार ई. सर्व जाती एकाच कुळामध्ये समाविष्ट असलेल्या दिसून येतात. *सर्वांचा निर्मिक आहे एक धनी त्यांचे भयमणी धरा सर्व न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा आनंद करावा भांडू नये*.1888 मधील गोष्ट आहे इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया आणि तिचा मुलगा प्रिन्स आर्थर पुण्यात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मोठे जहागीरदार, रावबहादुर, बडे अधिकारी शास्त्री पंडित अशी मोठमोठी मंडळी त्यांच्या दरबारात हजर झाली होती. सगळीकडे कडेकोट बंदोबस्त होता. प्रिन्स आर्थरचे आगमन होताच सनया वाजवण्यात आल्या. ढोल वाजले,सलामी मुजरे झाले, प्रिन्सची स्वारी आयटीत आली आणि खास बनवलेल्या सिंहासनावर विराजमान झाली. दरबार सुरू झाला. इतक्यात एक व्यक्ती दरवाजा जवळ आली पायात कातडी चपला. कमरेला धोतर अंगात ठिगळे  लावलेली पैरण, डोक्यावर चिंध्या झालेले मुंडासे खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी अशा वेशातील व्यक्ती आली. पोलिसांनी त्यांना अडवले त्यांना वाटले कोण हा एवढ्या मोठ्या दरबारात दिसतो आहे. त्या व्यक्तीने कमरेला हात घातला आणि कागदाची सुरळी काढून दाखवली ती समारंभाचे निमंत्रण पत्रिका होती. दिन दुर्बलासाठी लढणारे त्यांना सन्मान मिळवून देणारे महात्मा ज्योतिराव फुले थेट दरबारात दाखल झाले.. युवराजला येथील शेतकऱ्यांची अवस्था दाखविण्यासाठी ते शेतकऱ्यांच्या वेशातआले होते शेतकऱ्यांची स्थिती अतिशय पोट तिडकीने त्यांनी युवराजा समोर मांडली. येथे नटून आलेले लोक म्हणजे इथली प्रजा नसून दिवस-रात्र राबुन घाम गाळून शेत पिकवणाऱ्या इथल्या प्रजेला आजही अर्ध पोटी राहावं लागत आहे अंग झाकण्यापुरते कापडही त्यांना मिळू शकत आहे अशा प्रकारची व्यथा युवराजा समोर ज्योतिरावांनी मांडली. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी हाती घेतले होते हे यावरून लक्षात येते. आजही त्यांचे हे विचार खऱ्या अर्थाने शेतकरी प्रश्नाच्या बाबतीत प्रासंगिक वाटतात. ज्योतिराव नेहमी म्हणत असत स्त्रियांचा विकास म्हणजेच कुटुंबाचा व समाजाचा देखील विकास आहे आणि समाजाचा विकास म्हणजेच देशाला प्रगतीपथावर नेण्याचा मार्ग आहे. ज्योतिरावांनी दिलेले प्रेरणादायी विचार आत्मसात करण्याची देशाला आजच्या काळात नेतांत गरज असून सर्वांच्याच सर्वांगीण उन्नतीसाठी जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंत निर्भीडपणे लढा देणारे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिराव फुले होत. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाच्या महान कार्यामुळेच येणाऱ्या पिढीला वारंवार प्रेरणा मिळत राहणार आहे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आपणही समाजकार्याकरिता तन मन धनाने आपले योगदान दिले पाहिजे. समाजातील अनिष्ट प्रथांचा स्वीकार न करता समाजाला त्या पासून परावर्त केले पाहिजे हीच खऱ्या अर्थाने या मानवतावादी व्यक्तिमत्वास त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली ठरेल शेवटी एवढेच.                *झेप घे तू उंच गगनात उंच घे तु भरारी                        मावळलेल्या सूर्यानंतर प्रकाश दे दारोदारी.                        विळख्यात तू गुलामीच्या अजूनही तो गुंतलेला                              अरे बंड कराया सांग आता तुझ्या मधल्या माणसाला.            एकटा तु फिरताना घे हातात हात सारे                                  वाहूदे वादळात पुन्हा एकदा क्रांतीचे वारे, वाहू दे वादळात पुन्हा एकदा क्रांतीचे वारे* धन्यवाद,!

                प्रा. मकरंद जोगदंड                    ( वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर) 

No comments:

Post a Comment