Tuesday, April 11, 2023

जुगार अड्यावर धाड रोख रक्कमसह दोघांना घेतले ताब्यात. पंकज कुमावत यांच्या पथकाची कारवाई.

नेकनूर (प्रतिनिधी) नेकनूर येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला ग्राम पंचायत कार्यालयाजवळ मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी काल दुपारी त्याठिकाणी छापा मारला असता मटका खेळणारे पळून गेले. यावेळी पोलीसांना दोघा जणांना ताब्यात घेण्यात यश आले. त्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई पंकज कुमावत यांच्या पथकाने केली.
सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना नेकनूर ग्राम पंचायत च्या पाठीमागे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी आपले पथक पाठवून कारवाईचे आदेश दिले असता. पोलीस कॉन्टेबल शेख शमीम पाशा, पो.ना.गित्ते, पोलीस अमलदार बहीरवाल यांनी छापा मारला असता. रवी प्रकाश जाधव, संतोष वाघमारे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. ते दोघे जुगार्‍यांना एकत्र करुन जुगार खेळवीत होते. रवि प्रकाश जाधव हा सचिन उर्फ पप्प राऊत रा.नेकनूर याच्याकडून 10 टक्के कमीशनवर मटका घेत होता. तर संतोष संदिपान वाघमारे हा उत्तरेश्वर खिंडकर रा.नेकनूर याच्याकडून 10 टक्के कमीशनवर मटका घेत असल्याचे उघड झाले. त्या चौघांवरही नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment