*शिवसेना ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन आम्ही आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.
उदगीर (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकाणी धुमाकूळ घातल आहे. अनेक राजकीय पक्षांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आपले उमेदवार रींगणात उतरवले आहे.बाजार समितीच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असताना लातूरच्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीच्या निवडणूकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, लातूरच्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच ठाकरे गटाने गंभीर आरोप करत महाविकास आघाडीच्या प्रचारातून स्वतःला वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे.
निवडणुकीसााठी अनपेक्षित आघाडी अस्तित्वात आली. यात शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीतून वगळण्यात आले. निवडणुकीत शिवसेनेकडून २ जागांसाठी मागणी करण्यात आली होती. परंतु उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी झालेल्या राजकीय घडामोडी मध्ये शिवसेनेला वगळण्यात आले. सोमवारी दुपारी उदगीर येथे शिवसेना ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना अलिप्त राहणार असल्याचे जाहीर केले.
No comments:
Post a Comment