मुलाला गुजराती भाषेतील पेपर आल्यानं पालकांनी याबद्दल मुख्याध्यापकांकडे विचारणा केली. त्यावर मुख्याध्यापक राम वाघुंबरेंनी उलट उत्तरे दिली. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. कोणाकडे जायचे असेल तिथे जा, अशा उत्तरामुळे पालक पूर्णपणे गोंधळून गेले. गुजराती भाषेतील प्रश्नपत्रिकेमुळे विद्याथ्याचे नुकसान होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक विवंचनेत आहे
आमच्या प्रतिनिधींनी मुख्याध्यापक राम वाघुंबरे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी शाळेत कर्मचारी वर्ग कमी असल्याचे कारण दिले. या प्रकाराला शिक्षक जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या शाळेत शेकडो विद्यार्थी आहेत. मात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या अगदीच कमी आहे. विद्यार्थ्याला १५ दिवसांपूर्वी हॉल तिकीट मिळाले होते. त्यामुळे त्यांनी हा प्रकार आधीच निदर्शनास आणून द्यायला हवा होता, असं वाघुंबरे म्हणाले.

No comments:
Post a Comment