Saturday, April 8, 2023

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू. दोन शेळ्याही दगावल्या.


आष्टी (प्रतिनिधी) - शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकर्‍याचा अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नागतळा रोडवर घडली. महादेव किसन गर्जे (६०) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील महादेव किसन गर्जे हे शनिवारी दुपारच्या दरम्यान दोन शेळ्या घेऊन सुर्डी नागतळा रोडवरील सर्व्हे नंबर दहा या शेतात गेले होते. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.  पाऊस वाढल्याने ते एका झाडाखाली थांबले. मात्र, याचवेळी झाडावर वीज कोसळून त्यांचा जागीच मुत्यू झाला. यात त्यांच्यासह दोन शेळ्या देखील मृत झाल्या आहेत. वादळी वाऱ्यासह विजेच्या कडाकडासह पाऊस झाल्याने शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment