Tuesday, April 4, 2023

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात डॉ.अविनाश येळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनमाला गुंडरे यांनी डॉ. अविनाश येळीकरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर सदस्य, मेडिकल कौन्सिल सदस्य, मराठवाड्यातील पहिले प्लास्टिक सर्जन तसेच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष म्हणून शेवटपर्यंत केलेले कार्य सर्वांच्या आठवणीत राहिल आशा त्या म्हणाल्या. यावेळी महाविद्यालयातील डॉ. श्रीहरी गुट्टे ,डॉ.एल आर मुंडे, प्रा. भगवान कदम, प्रा. ज्ञानेश्वर आघाव, प्रा. संकेत हंडीबाग, प्रा. युवराज कोठुळे, प्रा. सरफराज शेख, प्रा. लव्हाळे, डॉ. विलास चौधरी, प्रा. देशमुख मॅडम, प्रा. बनसोडे मॅडम, ग्रंथपाल सीता बनसोडे, लता मिसाळ ,अमोल सरवदे, दत्ता सौंदळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment