बीडच्या अमळनेरमध्ये अनेक ठिकाणी जुगार अड्डे चालविले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर धाड टाकण्याची कारवाई केली आहे. जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात
पोलिसांनी ६ जुगाऱ्यांना अटक केली आहे. तसेच कारवाईत १ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बीडच्या अमळनेर पोलीस ठाण्यात जुगारी आजिनाथ भाऊ फरताडे (रा. पांढरवाडी ता. पाटोदा), नामदेव माणिक जाधव (रा.चिंचोली), विठ्ठल किसन पवार (रा. शिंदेवाडी ता.पाथर्डी, जि. अहमदनगर), राजू गजेंद्र जाधव (रा.चिंचोली ता.पाटोदा), सुग्रीव बाजीराव मिसाळ (रा. डागाचीवाडी ता.पाटोदा), तुकाराम भीमराव गायकवाड (रा.कोतन, ता.पाटोदा) या जुगाऱ्यांसह क्लबचा मालक सुरेश अरुण पोकळे यांच्याविरोधात कलम 12 (अ )महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment