परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जि प कें प्रा शा नुतन परळी चे केंद्रीय मुख्याध्यापक मोहन कांबळे सर व जि प प्रा शा वाघाबेट शाळेचे मुख्याध्यापक भगवान राठोड सर यांचा सेवानिवृत्ती निम्मित कें नुतन परळी सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जि प कन्या माध्यमिक शाळा परळी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं स. परळीचे गटशिक्षणाधिकारी श्रीराम कनाके साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती हिना अन्सारी मॅडम ,नुतन केंद्राचे केंद्रप्रमुख यादव पल्लेवाड, कन्या शाळेचे मुख्याध्यापक शास्त्री कांबळे,सिरसाळा केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक मधुकर घोडके ,तालुका शा पो आ प्रमुख श्री अशोक कराड,साधन व्यक्ती बालासाहेब दहिफळे,जाधव व्ही पी,मुंडे सर आदी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या नंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.सत्कार मूर्ती मोहन कांबळे सर व भगवान राठोड सर यांचा कें नुतन परळीचा वतीने गटशिक्षणाधिकारी श्रीराम कणाके जे शिक्षण वि अधिकारी अन्सारी मॅडम ,केंद्रप्रमुख पल्लेवाड व उपस्थित पाहुण्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अशोक नावंदे सर,बालाजी गुट्टे सर,दिनकर येवतेकर सर, महादेव फड सर,सौदागर कांदे सर,श्रीमती घाडगे मॅडम यांनी सत्कारमूर्ती यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.
जे शिक्षण वि अधिकारी अन्सारी मॅडम ,केंद्रप्रमुख पल्लेवाड यांनी सत्कारमूर्ती श्री कांबळे सर व भगवान राठोड यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. सत्कारमूर्ती मोहन कांबळे सर व भगवान राठोड यांनी सत्काराला उत्तर दिले. अध्यक्षीय समारोपात गटशिक्षणाधिकारी कणाके साहेब यांनी दोघांचेही कार्य अनुकरणीय होते असे सांगून अशा कार्यक्रमाच्या आयोजनातून केलेल्या सेवेचा आनंद मिळतो व आपल्याच माणसांनी केलेला हा सत्कार पुढील आयुष्यात ऊर्जा निर्माण करतो असे सांगून शासनाच्या विध्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना सर्व शाळांनी प्रभावीपणे राबवाव्यात असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक नावंदे सर यांनी तर आभार अनंतराव गव्हाणे सरांनी मानले.राष्ट्रगीत गायना नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .निरोप समारंभास नुतन केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधू भगिनी यांच्यासह अनेक शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नुतन परळी केंद्राच्या सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment