लाचलुचपत विभागाला मिळालेल्या तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी शिल्पा घाटोळ यांनी 20 हजाराची लाच पंचासमक्ष मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात पोलीस उप अधिक्षक किरण बिडवे, पोनि सदानंद वाघमारे, पोनि बसवेश्वर जकीकोरे पोह. चंद्रशेखर निलपत्रेवार, पोह. मिलिंद हनुमंते, पोशि मुक्तार शेख, पौह जनार्धन कदम यांच्या पथकाने सापळा यशस्वी केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारच्या आईस न्यायालयाच्या आदेशाने वडिलोपार्जित जमिनीचा हिस्सा मिळाला होता. त्या जमीनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करुन फेरफार घेण्यासाठी तक्रारदाराने गंगाखेड तालुक्यातील रुमणा सज्जाचे तलाठी शिल्पा घाटोळ यांच्याशी संपर्क साधला.
मात्र तलाठी घाटोळ यांनी पंचासमक्ष 20 हजार रुपयांची मागणी केली होती. पैश्याची मागणी केल्याची तक्रार 21 मार्च रोजी लाचलुचपत विभागाला मिळाली होती, तक्रारीची पडताळणी केली असता 20 हजाराची लाच घेतल्याचे पंचासमोर निष्पन्न झाले. त्यानंतर शिल्पा घाटोळ यांच्यावर परभणीच्या नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आह़े.
No comments:
Post a Comment