Tuesday, April 25, 2023

चोरट्यांनी महिलांच्या डोक्यात दगडाने लोखंडी रॉडने केला हल्ला. घटनेत २ महिला गंभीर जखमी.

वडवणी (प्रतिनिधी) : बीडमध्ये चोरट्यांचा मोठा सुळसुळाट सुटला आहे. रात्री घरात फक्त महिला असल्याचा फायदा घेत दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र महिलांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला. यावेळी चोरट्यांनी महिलांच्या डोक्यात दगडाने हल्ला केला त्यामुळे या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
वडवणी तालुक्यातील देवडी येथे मध्यरात्री ही घटना घडली आहे. दे दोन चोरटे आधी शिवाजी अच्युतराव आगे यांच्या घराच्या गेटचे लॉक तोडून आतमध्ये शिरले होते. यावेळी त्यांनी घरातील सर्वजण एका रूममध्ये झोपल्याचा अंदाज घेतला आणि दाराला बाहेरून कडी लावली. दुसऱ्या घरात आत प्रवेश करून शोधाशोध घेतली असता त्यांना त्या ठिकाणी काहीच सापडले नाही.
त्यानंतर चोरट्यांनी शेजारील चंद्रकांत नामदेव झाटे यांच्या घरामध्ये प्रवेश केला, यावेळी घरामध्ये पुरुष माणसे कोणीच नाही याचा फायदा घेत घरातील कपाटात शोधाशोध केली. ही गोष्ट घरातील महिलांच्या लक्षात आली. कोणीतरी आपल्या घरात प्रवेश करून कपाट उघडत आहे, असं महिलांना जाणवलं.
यावेळी मनीषा बाळासाहेब झाटे व सुरेखा अण्णासाहेब झाटे या दोन महिलांनी चोरट्यांना चोरी करण्यास विरोध केला. त्यावेळी त्यांना लोखंडी रॉड व दगड डोक्यात घालून जबर मारहाण करण्यात आली. या दोन्ही महिला जखमी झाल्या आहेत. यावेळी आरडाओरड होण्याचा अंदाज पाहून चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. दरम्यान यातील दोन्ही जखमी महिलांवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या घटनेत चोरट्यांचा शोध घेत आहेत.

No comments:

Post a Comment