
नेकनूर (प्रतिनीधी )- गेल्या काही दिवसांपूर्वी नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका कंटेनरमध्ये २६ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. या गुटख्याची होळी आज अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी केली. हा जप्त केलेला गुटखा कमलापसंद पानमसाला होता.
कंटेनर (क्र. एच.आर.८४-७८८८) या गाडीत गुटखा पकडण्यात आला होता. या गुटख्याची किंमत २६ लाख ७४ हजार ८२४ इतकी होती. जप्त केलेला गुटखा आज नेकनूरपासून ३ कि.मी. अंतरावर जाळण्यात आला. या वेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सय्यद इमरान हाशमी, भिसे अनिकेत, महारेवार ऋषिकेश, मुख्तार शेख, नेकनूर ठाण्याचे केंद्रेंसह आदी कर्मचारी व इतरांच्या उपस्थितीत गुटख्याची होळी करण्यात आली.
No comments:
Post a Comment