* जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशने आरोग्य विभागाची मोठी कारवाई.
परळी वैजनाथ (प्रतिनीधी) : देशभरात गाजलेल्या अवैध गर्भपाताच्या गुन्ह्यात जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या डॉ. सुदाम मुंडे यांनी बेकायदेशीरपणे दवाखाना सुरु ठेवला. याची कुणकुण लागल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने शनिवारी मध्यरात्री सदरील दवाखान्यावर छापा मारला. यावेळी काही संशयास्पद साहित्य आणि औषधी सापडले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
२०१२ सालच्या एका अवैध गर्भपात प्रकरणी बीड जिल्हा न्यायालयाने सुदाम मुंडेला पत्नी सरस्वतीसह दोषी ठरवून दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. परंतु, ही शिक्षा भोगत असताना काही महिन्यापूर्वी त्याला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने परळीजवळ बेकायदेशीरपणे दवाखाना सुरु केला. याबाबत आरोग्य विभागाकडे माहिती आली होती. त्यानंतर पाळत ठेऊन ही कारवाई करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्देश दिल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात हे स्वतः परळीत तळ ठोकून होते असे समजते. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत तब्बल सहा ते सात तास ही कारवाई सुरु होती. यावेळी गर्भपातासाठी आवाश्यक असणारे काही संशयास्पद साहित्य आणि औषधी सापडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. . याप्रकरणी सध्या सुदाम मुंडे यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्याची चौकशी सुरु आहे.
No comments:
Post a Comment