परळी वैजनाथ दि.17 (प्रतिनिधी) -येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न झाले.
शक्तीकुंज वसाहतीतील महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमास स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळराव काकडे, न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील लोमटे, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक श्री अजय सोळंके सर त्याचप्रमाणे दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टंसिंग चे योग्य पालन करण्यात आले होते. तसेच सर्व उपस्थितांनी मास्क चा वापर केला होता.

No comments:
Post a Comment