परळी ; प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीतील, वसुंधरारत्न राष्ट्रसंत 108 ष. ब्र. डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज,अहमदपुरकर यांच्या 82 व्या श्रावणमास तपोनुष्ठानाच्या मौनमुक्ती सांगता समारंभास 2 सप्टेंबर रोजी, 2 वर्षे पूर्ण झाली आहेत.
श्री.गणेश बप्पांसोबतच अनंत चतूर्दशी रोजी सर्व समाज भाविक भक्तांचे परम श्रध्दास्थान आधुनिक विज्ञान युगातील 21 व्या शतकातील महान तपस्वी आपल्या सर्वांचे परम वंदनीय व परम आदरणीय ‘अप्पा' शिवैक्य झाले. स्वातंत्र्य पूर्व काळात एम.बी.बी.एस.शिक्षण झालेले असताना, संपूर्ण मानवासाठी समाजाभिमुख, लोककल्याणकारी अप्पांचे कार्य त्यांच्या जीवनातील संघर्ष, त्यागातून,साधना,तपश्चर्या व अफाट स्मरणशक्तीमुळे भारत देशाच्या मा.पंतप्रधानसह महाराष्ट्र राज्याच्या मा.मुख्यमंत्री तसेच विविध राज्य व सर्व भक्तांसाठी वंदनीय आहे. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना प्रेमाची व जिव्हाळयाची वागणूक त्यासोबतच सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण करून केले जाणारे मार्गदर्शन व समुपदेशन यामुळे मिळणारा मानसिक आधार व दिलासा मानवी जीवन जगण्याचे सामर्थ्य अप्पांच्या माध्यमातून व आशीर्वादातून मिळायचे. निगर्वीपणा,नि:स्वार्थीपणा व कुठल्याही प्रकारच्या मोहाला बळी न पडता त्यांनी त्यांचे समाजासाठीचे कार्य सामाजिक एैक्यासाठी वयाच्या 105 व्या वर्षी शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवले. समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी अप्पांनी 21 दिवसांचे त्यांच्या जीवनातील पार पाडलेले 84 श्रावणमासातील मौन तपोनुष्ठान युगानुयुगे चिरकाल स्मरणात सदैव राहणार आहे.सर्व भक्तांना राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांची(अप्पा) यांची अत्यंत साधी रहाणी व उच्च आचार-विचार - तत्वचिंतन, शिकवण सर्वांना सदैव प्रेरणादायी आणि जगण्याची ऊर्जा देत राहील. अप्पांनी विज्ञान आणि अध्यात्म या दोघांचे महत्त्व जाणून त्यांची एक योग्य ती सांगड घालून त्याचा विश्व कल्याणासाठी अखंड प्रसार आणि प्रचार केला. आयुष्यभर समाजोन्नतीसाठी चंदनासारखे आपले स्वतःचे आयुष्य झिजवले. त्यांनी वेळोवेळी दिलेली वीरशैव तत्वज्ञानाचे व आचार विचाराचे तत्त्व आपण सर्वजणांनी जाणीवपूर्वक अंगिकारून त्याचा एकजुटीने व नेटाने प्रचार व प्रसार करणे हीच खरी आप्पांना श्रद्धांजली व आदरांजली ठरेल.अप्पांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!
No comments:
Post a Comment