बीड (प्रतिनिधी) - काकू नाना आडत मार्केट मधील दररोज वेगवेगळ्या कारणांमुळे नागरिक त्रस्त आहेत व आज या ठिकाणी विद्युत पोल ची अवस्था खूपच बिकट झाली असून या ठिकाणी या वाकलेल्या पोल मुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
काकू नाना आवडत मार्केटमधील दररोज कितीतरी शेतकरी आपला भाजीपाला विकण्यासाठी बाहेरगावावरून येतात व किती तरी किरकोळ व्यापारी सुद्धा या ठिकाणी मालवा घेण्यासाठी येत असतात अडत मार्केटमधील वाकलेल्या पोल वरून विद्युत् प्रवाह करणारी तार आहे व जर वादळी वारा जोराचा आला तर यामुळे पोल खाली पडुन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे तरी महावितरण विभागाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
No comments:
Post a Comment