"कंगना राणावतचं करायचं काय,खाली मुडकं वर पाय" घोषणा.
बीड (प्रतिनिधी);- आज बीड शहरातील महिला शिवसेनेच्या वतीने कंगना रानावतची शव यात्रा माने काॅम्पेकस समोर काढण्यात आली. कंगना रानावत हिने मुंबई पोलिस व मुंबई बद्दल अपशब्द वापरल्याने बीड महिला शिवसेनेच्या वतीने अंतीम यात्रा काडुन कंगना रानावतचं करायचं काय,खाली मुडकं वर पाय अशे घोषणा देत अंतीम यात्रा काढण्यात आली.
महिला शिवसेना बीड जिल्हा अध्यक्षा अॅड.संगीता ताई चव्हाण यांनी कंगना रानावत विषयी सांगीतले की या कंगना राणावत ने मुंबईत येऊन आपल्या करिअरची सुरुवात केली व आम्ही तीचा चित्रपट बघत होतो मात्र ज्या शहरांने करिअर घडून दिले त्याच मुंबई शहराला आज हि नाव ठेवत आहे व मुंबई पोलीस बद्दल अपशब्द वापरत आहेत आम्ही महिला बीड जिल्हा शिवसैनिक हे खपवून घेणार नाही असा इशारा देत ताचा निषेध व्यक्त केले आहे.
मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीर सोबत करणाऱ्या सिनेअभिनेत्री कंगना राणावत हिने महाराष्ट्र द्रोह केला असून तिच्या अंत यात्रा काडून जाहीर निषेध करताना बीड जिल्हा शिवसेना महिला आघाडी च्या वतीने शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख ॲड संगीताताई चव्हाण, फर्जना शेख, शांता राऊत, शामल पवार,सारिका काळे, रेखा वाघमारे, सगीता वाघमारे, सारिका डोगरे,भागिरीती जाधव लक्ष्मी गुरुकुल इत्यादी शिवसेना महिला आघडी पदाधिकरी उपस्थिती होते.
No comments:
Post a Comment