* कार्ड धारकाला न सांगता,अंतोदय चे कार्ड बीपीएल,बीपीएल चे कार्ड एपीएल कसं काय ?
बीड (प्रतिनिधी) बीड तहसील कार्यालयात पुरवठा विभागाचा मनमानी कारभार चालू असून या ठिकाणी गेल्या चार-पाच महिन्यांपासून काही लोकांचे राशन कार्ड उडविले आहे व अंत्योदय धारकाचे कार्ड बीपीएल मध्ये टाकले व बीपीएल चे कार्ड एपीएल मध्ये केले आणि कितीतरी लोकांचे कार्ड डिलीटच केलेत त्या लोकांना कोणताच राशन दुकानदार धान्य देत नाही व ते लोक अजूनही धान्यापासून वंचितच आहेत परंतु याकडे पुरवठा अधिकाऱ्याचा लक्ष जात नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
तहसील मध्ये दररोज कितीतरी लोक चकरा मारत आहेत त्यांना त्या ठिकाणी उत्तर भेटतो की तुमचे कार्ड दुकानदारांनी उडविले तर दुकानदाराकडे कार्ड धारक गेला असता दुकानदार म्हणतो की डाटा एंट्री ऑपरेटर ने तुमचे कार्ड डिलीट केले आहे असे उत्तर भेटतात नेमकं कार्ड डिलीट करण्याचा अधिकार कोणाला आहे?
असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.अशा महामारी च्या काळात लोकांना स्वस्त धान्य भेटत नाही लोकांना उपासमारीची वेळ आलेली असून देखील पुरवठा अधिकाऱ्याचा याकडे लक्ष का जात नाही?असा प्रश्न नागरीकांना निर्माण झाला आहे.
कितीतरी दुकानदाराकडून कार्ड ट्रान्सफर दुसऱ्या दुकानात करण्यात आले परंतु सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे नेमकं कार्डधारकाला न सांगता कार्ड ट्रान्सफर कसं काय दुसऱ्या दुकानात होवू शकतो?असा सवाल उपस्थित होत आहे ज्या दुकानात कार्ड गेले तो दुकानदार बोलतो की पहिले जिथे राशन घेत होते तिथेच तुम्हाला राशन भेटेल या ठीकाणी तुम्हाला राशन भेटनार नाही नेमकं त्या कार्डधारकांनी कोणत्या दुकानात जाऊन धान्य घ्यावं? असा प्रश्न कार्ड धारकाला निर्माण झाला आहे.
कोरोना सारख्या बिकट परिस्थितीत व महामारीत जर गरीब माणसाला धान्य भेटत नाही तर त्या स्वस्त धान्य दुकानेचा व सरकारी योजनेचा काय फायदा? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे पुरवठा विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत.
No comments:
Post a Comment