Wednesday, September 9, 2020

विनामास्क फिरणारांवर परळी नगर परिषदेची धडक कारवाई .


* परळीत दंडवसुली जोरात; नागरिकांनी नियमांचे पालन करावे - प्रशासनाचे आवाहन.


परळी वैजनाथ, (प्रतिनिधी) कोविड संसर्गापासून बचाव करण्यासाठी व संसर्ग रोखण्यासाठी नियमांची पायमल्ली होणे घातक ठरत आहे.कोविडविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी परळी नगर परिषद काटेकोरपणे दंडात्मक कारवाई करत आहे.



  विनामास्क फिरणारांवर चाप बसवण्यासाठी नगर परिषदेच्या धडाधड कारवाया सुरू करण्यात आलेल्या आहेत.परळीत दंडवसुली जोरात सुरू आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे प्रशासनाचे आवाहन आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी व नियमांचे पालन करावे असे आवाहन नगर परिषद प्र.मुख्याधिकारी बाबुराव रुपनर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment