परळी वैजनाथ (प्रतिनीधी) अवैध गर्भपात प्रकरणी 10 दहा वर्षाची शिक्षा भोगून आलेल्या व सध्या जामिनावर असलेले परळीच्या कुप्रसिद्ध डॉ.सुदाम मुंडे हे मागील एक वर्षापासून परळी शहरालगत रामनगर भागात अवैधरित्या हॉस्पिटल चालून रुग्णांवर उपचार करत होते जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार पथकाने तपासणी केली असता कोरोना संशयित रुग्णाबरोबरच इतर रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आढळले.तपासणीसाठी गेलेल्या पथकातील अधिकार्यांना शिवीगाळ करत दमदाटीही केली याप्रकरणी सुदाम मुंडे यांच्याविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सुदाम मुंडे यांना परळी न्यायालयात दाखल केले असता त्यांना दि.11 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सन 2010 साली अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर मागील दहा वर्षे शिक्षा भोगुन आलेल्या व सध्या जामिनावर असलेल्या डॉ.सुदाम मुंडे यांनी मागील एक वर्षांपासुन परळी शहरालगत रामनगर भागात असलेल्या आपल्या शेतात हॉस्पीटल थाटुन रुग्णांवर उपचार सुरु केले होते.नर्सिंग होम चालविण्यासाठी आवश्यक त्या सुविधा व परवाना नसताना हे हॉस्पिटल सुरु होते.तुलनेने कमी पैशात इलाज होत असल्याने त्यांच्याकडे रुग्णांची गर्दी वाढत गेली .या वर्षभरात एक दोन मजली इमारत बांधून सध्या तित प्रॅक्टीस सुरु होती.याबाबत प्रशासनास खबर मिळताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बोगस डॉक्टर तपासणीचे आदेश दिल्यानंतर स्थापन केलेल्या पथकाने शनिवार दि.5 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वा.सदरील हॉस्पीटलची तपासणी सुरु केली.यात नर्सिंग होम चालविण्याचे,वैद्यकिय व्यवसाय करण्याचे प्रमाणपत्र सुदाम मुंडे हे दाखवु शकले नाहीत उलट तपासणी करण्यास आलेल्या अधिकार्यांना अरेरावीची भाषा वापरुन,दमदाटी व करत थोबाडीत मारण्याची धमकी दिली.यानंतरही पथकाने दवाखान्याची पुर्ण तपासणी केली असता चार रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे दिसुन आले.सुदाम मुंडे यांचे वैद्यकिय व्यवसायाची नोंदणी व वैद्यकिय सेवेचे प्रमाणपत्र महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेने ऑक्टोबर 2020 पर्यंत निलंबित केलेले असताना वैद्यकिय व्यवसाय सुरुच असल्याने सुदाम मुंडे यांच्याविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात धर्मापुरी प्रा.आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी तथा तपासणी पथकप्रमुख बालासाहेब मेढे यांच्या फिर्यादीवरुन वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या गुन्ह्यासाठी लागली ही कलमे
सुदाम मुंडे यांच्या बोगस हॉस्पिटलच्या तपासणीत गर्भपातासाठी आवश्यक असणारी वैद्यकिय साधने व उपकरणे आढळुन आल्याने वैद्यकिय गर्भपात कायद्याखाली कलम 3,4,5, वैद्यकिय असल्याचे भासवुन रुग्णांकडुन पैसे उकळल्याप्रकरणी कलम 419,420,तपासणी अधिकार्यांनी मागणी करुनही प्रमाणपत्र न दाखवणे व विचारलेल्या प्रश्नांची माहिती देण्यास नकार दिल्याने कलम 175 व 179 या कलमासह इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट अंतर्गत 15(2),महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीटीनर अॅक्ट 1961 चे कलम 33 (2),साथ रोग प्रतिबंध कायदा 1897 चे कलम 2,3 आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत 51(बी) या कलमासह भादंवि 353,188,269,270,278,504,3(2) कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नऊ जणांच्या पथकाने केली सात तास तपासणी
बोगस डॉक्टरांच्या या तपासणी पथकात उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक,तहसिलदार विपीन पाटिल,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात,वैद्यकिय अधिकारी ज्ञानोबा मुंडे,तालुका आरोग्य अधिकारी लक्ष्मण मोरे,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.दिनेश कुरमे,नायब तहसिलदार बाबुराव रुपनर,शहर पो.ठाण्याचे पो.नि.हेमंत कदम,संभाजीनगर पोलिस.ठाण्याचे पो.नि.बाळासाहेब पवार व पथकप्रमुख बालासाहेब मेढे या नऊ जणांचा समावेश होता.या पथकाने रात्री 9.30 ते पहाटे 4.30 अशी सात तास कसून तपासणी केली.
No comments:
Post a Comment