गोंदिया,(प्रतिनीधी) : कोरोना काळात आपल्या कर्तव्यावर असलेल्या एका आरोग्य कर्मचाèयाला स्वत:च्या आरोग्य यंत्रणेचा फटका बसल्याने उपचाराअभावी त्या आरोग्य वडीलाच्या कर्मचाèयाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेनंतर संबंधित आरोग्य कर्मचाèयाने आपली व्यथा आणि उपचाराची विनंती जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली. मात्र त्या विनवनीकडे जिल्हा शल्य चिकित्सकांनी केलेले दुर्लक्ष हे आरोग्य यंत्रणेतील निर्गरगठ्ठ पणाचे लक्षण असल्याचे दिसून आले. सर्वसामान्य कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याची ही सुनावनी होत नाही तिच परिस्थिती आरोग्य यंत्रणेत २४ तास कोरोना काळात सेवा देणाèया आरोग्य कर्मचाèयांही झाली आहे.
त्या संदर्भातील त्या कर्मचाèयाचे व्यथा मांडणारे व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल झाले असून जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाबाबत नागरिकांत असंतोष दिसून येत आहे. तर दुसरीकडे हृदय रोगाचे आजारी असलेले आमगाव येथील हुकूमचंद बहेकार हे कोरोना पॉजीटिव निघाल्यानंतर त्यांच्यावर हृदयरोगाशी संबंधित कुठलेही उपचार करण्यात आले नाही. आणि कोरोनाच्या नावावर एन्टी बायोटीक औषधी देत त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या दुर्लक्षमतेमुळे त्यांचाही जीव गेला. हृदयरोगाच्या उपचारासाठी ते गोंदियातील बहेकार रुग्णालयात गेले असता त्यांना कोरोनाची चाचणी करण्याचे सांगण्यात आले. चाचणीमध्ये ते पॉजीविट आल्याने त्यांना सरळ शासकीय विलगीकरण केंद्रात हलविण्यात आले. मात्र ते ज्या हृदयरोगाच्या उपचारासाठी आले होते त्या रोगावर जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय महाविद्यलयाच्या कुठल्याही वैद्यकीय अधिकाèयाने उपचारच केले नाही. ज्या विलगीकरण केंद्रात बहेकार यांना ठेवण्यात आले होते. त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तिंनी त्यांना त्रास होत असून उपचार देण्यासंबंधात आरोग्य यंत्रणेकडे मदत मागितली. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आणि कोरोनाच्या नावावर हृदयरोगाचे पिडीत असलेल्या हुकूमचंद बहेकारांना आरोग्य यंत्रणेच्या गलथानामुळे आपला जीव गमवावा लागला.
गोंदियाच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात चतुर्थश्रेणी पदावर कार्यरत असलेला कर्मचारी जो आपल्या सेवेदरम्यान कोरोनाने बाधित झालेला होता. तरीही तो सेवेवर हजर होता. त्यातच तो आपल्या कुटुंबियांच्या संपर्कात ही आल्याने त्याचे कुटुंब ही बाधित झाले. परंतु आधीपासूनच डायलीसीसवर असलेल्या त्याच्या भावाची प्रकृती खालावल्याने ३१ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचारासाठी आपले वरिष्ठ अधिकारी असलेले जिल्ह शल्य चिकित्सक भुषण रामटेके यांच्याकडे विनवनी करु लागला. परंतु त्या व्यक्तिच्या विनवनीकडे जिल्हा शल्य चिकित्सकाने दुर्लक्ष केले. आपल्या अधिनस्थ कर्मचाèयाचे म्हणने ही ऐकूण घेण्याचे सौजन्य त्यांनी दाखविले नसल्याने शेवटी त्या आरोग्य कर्मचाèयाला उपचारासाठी आपल्या भावाला नागपूरला हलवावे लागले.
जेव्हा तो कोरोना सकारात्मक आला त्यानंतर त्याच्या कुटुंबाला देखील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, या दरम्यान आधिपासूनच आजारी असलेले सदर कर्मचाèयाच्या वडीलाचा मृत्यू औषधाअभावी व उपचाराअभावी झाला. त्यानंतर पीडितेच्या भावाचीही तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. ज्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे डायलिसिस करणे अत्यंत आवश्यक होते, परंतु रुग्णालयात डायलिसिस सिस्टम नसल्यामुळे त्यांचे डायलिसिस होऊ शकले नाही.
या संदर्भात, रूग्णालयातील कर्मचाèयाने भावाच्या उपचारासाठी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकााèयांशी व डॉक्टरांशी संपर्क साधला पण कोणीही त्याला सहकार्य केले नाही. जेव्हा त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामटेके यांना भेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा जिल्हा शल्य चिकित्सकांनाीही त्याला भेटण्याऐवजी टाळले. त्यामुळे त्या कर्मचाèयाने जिल्हा शल्य चिकित्सकाच्या कार्यालयासमोरील खीङकी समोर उभे राहून आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. एक रुग्णालयातील कर्मचारी जो रात्रंदिवस रूग्ण आणि अधिकाèयांच्या सेवेत गुंतलेला आहे.जेव्हा तो शल्यचिकित्सकांकडे आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी विनवणी करीत होता, तेव्हा कोणी त्याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील गैर कारभाराची लक्तरे उड्यावर आली आहेत. ज्यामुळे जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

No comments:
Post a Comment