Friday, May 12, 2023

CID ची माेठी कारवाई.एकाच्या मृत्यू प्रकरणी पोलिस निरीक्षकाला अटक. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ.

बीड (प्रतिनिधी) : पोलीस कोठडीत असताना एका संशयित आराेपीच्या मृत्यू प्रकरणी सीआयडीने बीड येथील परळीमध्ये पोलीस निरीक्षकाला अटक केली. उमाकांत कस्तुरे असं अटक करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. कस्तुरे यांना अंबाजोगाई न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बीड परळी पोलीस ठाण्यात 2014 मध्ये कोठडीत चोरीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या एका संशयित आरोपीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीत संबंधिताचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता.

त्यानंतर या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांच्यावर सीआयडी मार्फत गुन्हा दाखल झाला. आता सीआयडीने कस्तुरे यांना अटक केली. दरम्यान या अटकेनंतर बीड पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

No comments:

Post a Comment