परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील पोहनेरच्या गोदा पात्रात वाळू माफियांनी उच्छाद मांडला होता. परळी महसूल मंडळाने बुधवारी मध्यरात्री दोन वाजता धाड टाकत दोन किनी ट्रॅक्टर व पोकलेन जप्त करत सिरसाळा पोलिस स्टेशनमध्ये जप्त केली. परळी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बीड जिल्ह्यातील गोदापात्रात ठिकठिकाणी वाळू माफीयांनी उच्छाद मांडला आहे. अवैधरित्या वाळू उपसा व चोरीची प्रकरणे रात्रंदिवस घडत आहेत. परळीच्या उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी दि.९ मंगळवारी मध्यरात्री पोहनेर जवळील गोदापत्रात धाड टाकत दोन किनी ट्रॅक्टर व एक पोकलेन वर कारवाई केली. एका ट्रॅक्टर चालकाने पथक पाहून पळ काढला. पोलीस शोध त्याचा घेत आहेत. ही कारवाई नायब तहसीलदार बी एल रुपनर, सिरसाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दहिफळे, मंडळ अधिकारी व्यंकट सूर्यवाड, मंडळ अधिकारी गणेश फड,तलाठी विष्णू गीते,तलाठी कांबळे, आदींनी केली. दरम्यान सिरसाळा पोलिसात ट्रॅक्टर व पोकलेन मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
No comments:
Post a Comment