पोलीस सूत्रांकडून मिळलेल्या माहितीवरून परळी येथील पीडिता ही सध्या भोसरी (पुणे) येथे राहते. त्या २४ मे रोजी येरवडा पुणे ते (Parali) परळी वैजनाथ असा गंगाखेड पुणे- गंगाखेड चालणाऱ्या स्वराज ट्रॅव्हल्सने प्रवास करत होत्या. यादरम्यान आरोपी चालक दत्ता विठ्ठल मोहिते (रा. गंगाखेड) याने वाईट हेतुने फिर्यादीस ट्रॅव्हल्समध्ये पाठीमागे चला नाहीतर मी सीटवर येवु का? तुमचा पर्सनल मोबाईल नंबर मला द्या, तुम्ही मला खुप आवडतात असे म्हणाला.
ट्रॅव्हल्स जेवणासाठी थांबली, चालकाने साधली संधी
दरम्यान प्रवासादरम्यान ट्रॅव्हल्स जेवणासाठी थांबली असता चालकाने पीडितेला ‘तुम्हाला जेवण खावु घालतो, तुम्ही माझी भुक भागवा'. असे म्हणत ट्रॅव्हल्स चालकाने पीडितेची छेड काढली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात आरोपी चालक दत्ता मोहिते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यामुळे ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
No comments:
Post a Comment