परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी सीबीएससी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून या विद्यालयाची विद्यार्थिनी कु. भक्ती लक्ष्मीकांत कराड हिने इयत्ता दहावीच्या सीबीएससी बोर्ड परीक्षेत 95.40% टक्के गुण संपादन करून परळी तालुक्यातून पहिल्या येण्याचा बहुमान मिळविला आहे.
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचा सन 2022-2023 शैक्षणिक वर्षाचा १० वाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विशेष म्हणजे केवळ ४२ विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त व ११ विद्यार्थ्यांना ८५% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या विद्यालयाचा विद्यार्थी सत्यम विष्णू तांबडे याने 94.60% गुण संपादन करून द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला असून सिद्धी आनंद टेंबे या विद्यार्थिनीने 93.20% गुण घेऊन तृतीय येण्याचा मान मिळविला आहे.श्रीशा मनोज शिंदे 92.80%, समीक्षा सचिन दुबे 91.40%, दिनेश प्रभाकर केदार 91%टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
संस्थेचे मार्गदर्शक किरण गित्ते साहेब सचिव, नगर विकास, सामाजिक बांधकाम, उद्योग, पर्यटन विभाग त्रिपुरा सरकार आणि अध्यक्षा सौ उषाताई किरण गिते यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment