Monday, May 8, 2023

मंदिराचा जीर्णोद्धार करताना सापडलं सोन्याचं कासव; पाहण्यासाठी भाविकांची गर्दी.

बीड (प्रतिनिधी) : अनेकदा मंदिरात अथवा विविध धार्मीक स्थळी अनेक चमत्कार पहायला मिळतात. यातील काही चमत्कार असे असतात की, त्यामुळे नागिरकांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. अशात बीडमधील एका मंदिराचा जीर्णोद्धार करताना एक चमत्कार झाला. महादेवाच्या पिंडीत चक्क सोन्याचे कासव सापडले आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बीडच्या  पुरुषोत्तमपुरीत मंदिराचा जीर्णोद्धार करताना महादेवाच्या पिंडीमध्ये सोन्याचे कासव‎ सापडले आहे. हे कासव पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत.
पुरुषोत्तमपुरी येथे देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे गोदावरी नदीच्या‎ काठावर मंदिर आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू असून हे काम सुरु असतानाच ही मूर्ती सापडली आहे.या मंदिराची निर्मिती 700 वर्षांपूर्वी राजा रामदेवराय यांनी केल्याचा इतिहास आहे.

No comments:

Post a Comment