Wednesday, May 10, 2023

अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर करावे.होळकर घराण्याचे वंशज स्वप्निलराजे होळकर यांची मागणी.


*अहमदनगर शहराचे नाव अहिल्यादेवी होळकर करावे, अशी मागणी स्वप्निलराजे होळकर यांनी केली आहे. त्यामुळे अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव या जिल्ह्यांचं नामांतर झाल्यानंतर अहमदनगरचं नामांतर करण्याची मागणी जोर धरू लागली होती. मात्र, या मागणीवरुन भाजपमध्येच दोन गट पडलेले पाहायला मिळाले. मात्र, आता थेट अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांनीच मागणी केली आहे. इंग्रजांना वेगवेगळ्या युद्धात तब्बल 18 वेळा पराभुत करणार्‍या शूर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शौर्ययात्रेचे पुणे ते इंदौर शौर्ययात्रा काढण्यात आली आहे. यावेळी बोलताना स्वप्निलराजे होळकर यांनी अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर करावे अशी मागणी केली आहे.

यशवंतराव होळकर यांच्या शौर्ययात्रेचे पुणे ते इंदौरकाढण्यात आली आहे. ही शौर्ययात्रा केडगाव येथे आल्यानंतर बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन स्टेट बँक चौक, डिएसपी चौक, प्रेमदान चौक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, भिस्तबाग येथे समारोप करण्यात येणार आहे. या ठिकाणी समाज बांधवांच्यावतीने या शौर्ययात्रेचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. या वेळी अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनीही यात्रेचे स्वागत केले.

या शौर्य यात्रेच्या मार्गवर धनगर समाजाचे पारंपारिक गजनृत्य, घोडे, उंट, ध्वजधारी पादचारी असा दिमाखदार सोहळा करण्याचे नियोजन केले होते, पुणे ते इंदोर काढण्यात आलेल्या यात्रेतून तरुण पिढीला प्रेरणा मिळावी आणि यशवंतराव होळकर यांनी केलेल्या कार्याची ओळख व्हावी यासाठी ही यात्रा काढण्यात आल्याचं यशवंतराव होळकर यांचे वंशज स्वप्निल राजे होळकर यांनी सांगितले.



No comments:

Post a Comment