पुणे (प्रतिनिधी) पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, पुण्याजवळील खडकवासला धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुली बुडाल्या आहेत. तर स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे 7 मुलींना वाचवण्यामध्ये यश आले आहे. खडकवासला परिसरातील गोऱ्हे खुर्द येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, या 2 बेपत्ता मुलींचा शोध सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार.! पुणेजवळील गोऱ्हे खुर्द गावाच्या हद्दीत कलमाडी फार्म हाऊसजवळ खडकवासला धरणामध्ये पोहण्यासाठी 9 मुली उतरल्या. सकाळी 9 च्या सुमारास या मुली पाण्यामध्ये उतरल्या. पण पाण्याचा अंदाज न आल्याने या सर्व मुली पाण्यामध्ये बुडू लागल्या. त्याचवेळी धरणाच्या काठाजवळ दशक्रिया विधीसाठी आलेल्या काहींना या मुली बुडत असल्याचे दिसले. त्यानंतर या लोकांनी धरणामध्ये उडी मारत 9 पैकी 7 मुलींना सुखरुप बाहेर काढले. मात्र 2 मुली धरणामध्ये बुडाल्या असल्याने, त्यांचा शोध सुरु आहे.
या सर्व मुलींचे अंदाजे वय 16 ते 17 वर्षे असल्याचे सांगण्यात येत असून, धरणामध्ये बुडालेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment