तर याच वीज दुर्घटनेपासून वाचण्यासाठी आणि आपल्या पशुधनाला वाचवण्यासाठी, शासनाकडून दामिनी नावाचे एक ॲप तयार करण्यात आलेले आहे. या दामिनी ॲपच्या माध्यमातून आपण आपले पशुधन व आपण आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो. याच्यासाठ दामिनी ॲप आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करावं.असं आवाहन जिल्हा प्रशासनासह शासनाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान दामिनी ॲप मिनिस्ट्री ऑफ सायन्सेस यांनी तयार केलेले आहे. विज पडण्याची माहिती मिळावी, याच्यासाठी हे शासनाने तयार केलेले आहे. IITM यांनी हे ॲप सर्वसामान्य नागरिकांसाठी तयार करण्यात आलेले आहे. आज प्रत्येक व्यक्तीकडे व सर्वसामान्य नागरिकाकडे अँड्रॉइड मोबाइल आहे.
प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांनी हा ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावा. जेणेकरून ज्यावेळेस विजांचा कडकडाट होईल, त्यावेळेस वीज ही कोणत्या ठिकाणी पडणार आहे. याची माहिती तब्बल आपण आहोत त्या ठिकाणापासून 40 किलोमीटर अंतरापर्यंत मिळते.
त्याचबरोबर ही वीज किती वेळा नंतर पडणार आहे ? याची सुद्धा माहिती ह्या ॲपमध्ये दिलेली आहे, जेणेकरून शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांना आपलं जीवन सुरक्षित ठेवता येईल. असं आवाहन आपत्ती व्यवस्थापक राजदीप बनसोड यांनी केलं आहे.
No comments:
Post a Comment