Tuesday, May 16, 2023

दुचाकीला कारने पाठीमागून उडवले दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. केज - अंबाजोगाई महामार्गांवर केशव जिनिंग समोर झाला अपघात.


केज (प्रतिनिधी): केज - अंबाजोगाई महामार्गांवर दुचाकीला कारने पाठीमागून धडक दिल्याची घटना आज सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. महादेव हनुमंत पांचाळ असे मृताचे नाव आहे.

ढाकेफळ येथून महादेव हनुमंत पांचाळ ( 60, रा. ढाकेफळ) हे दुचाकीवरून ( एमएच 23 / 1927) केजकडे येत होते. केशव जिनिंगसमोर सकाळी ११. ३० वाजेच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीला कारने ( क्र.MH25 / A 3196) पाठीमागून धडक दिली. यात दुचाकीवरील महादेव हनुमंत पांचाळ यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच जमादार बाबासाहेब बांगर व पाशा शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. महादेव पांचाळ यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले.

No comments:

Post a Comment