Thursday, March 23, 2023

धक्कादायक ! कर्तव्यावर असताना अस्वस्थ वाटू लागले.उपचारादरम्यान पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू.


आष्टी (प्रतिनिधी) - कर्तव्यावर असताना अचानक हृदयविकाराच्या धक्का आल्याने पोलीस उपनिरीक्षकास उपचारासाठी अहमदनगर येथे उपचारासाठी बुधवारी दाखल करण्यात आले होते. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजी नागरगोजे ( ५७ ) असे मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्यात शिवाजी नागरगोजे हे पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत होते. बुधवारी कर्तव्यावर असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे सायंकाळी त्याने अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. नागरगोजे हे तालुक्यातील दादेगांव येथील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 


No comments:

Post a Comment