Saturday, March 11, 2023

चिऊ ताई ये चारा खा, पाणी पी भुर्र उडून जा! नई सोच युवा शक्ती सामाजिक संघटना चे उपक्रम.

वरोरा (प्रतिनिधी) -उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, तापमानात वाढ होत आहे, नदी नाल्यामधील पाणी आटले आहेत. त्यामुळे पक्षांसाठी पाण्याची, धान्याची व्यवस्था करण्यात आली. 
अभिजीत कुडे यांच्या   नई  सोच युवा शक्ति सामाजिक संघटना तर्फे पक्षांसाठी स्तुत्य उपक्रम
उन्हाळ्याची चाहूल लागताच पक्षांना पिण्याचे पाणी आणि खायला अन्न याची चणचण भासत असते अशातच पक्षांना पाणी आणि अन्न मिळावे यासाठी  नई  सोच युवा शक्ति सामाजिक संघटना यांनी अभिनव उपक्रम सुरू केला आहे।  या उपक्रमांतर्गत त्यांनी मातीच्या भांड्यात   उपयोग करतात पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी आणि अन्नाचे दाणे त्यामध्ये ठेवण्याचे आणि ते शहरातील विविध ठिकाणी लावण्याचे ठरवले आहे।  दिवसेंदिवस चिमणी, कावळे व पक्षी दुर्मिळ होत चाललेले आहेत तसेच ना भीषण  उन्हाळा बघता बऱ्याच वेळी पक्षांना खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांचा जीव सुद्धा जातो।  नई  सोच युवा शक्ति सामाजिक संघटना  यांनी असेच शंभर मातीचे भांडे पक्षांसाठी पिण्याचे पाणी आणि अन्नधान्य ठेवण्यात येणार आहे। हे भांडे अथवा तेलाचे  पिपे झाडांवर लावण्यात येणार आहे जेणेकरून पक्ष्यांना पाणी आणि धान्य घेता येईल.
 या अभिनव उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे।
 या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी  नई  सोच युवा शक्ति सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष अभिजित कुडे ,सुयोग शेंडे, पंकज मांडवकर, शुभम हिवरकर,कार्तिक राऊत  ,विजय कुडे ,तेजस  ऊरकुडे  या  अथक प्रयत्न करीत आहेत

No comments:

Post a Comment