आष्टी पोलीस आणि अन्न प्रशासनाने आष्टी शहरातील संभाजी नगर भागातील एका गोडाऊनवर छापा टाकला. त्यात भेसळयुक्त दूध बनवण्यासाठी लागणारे पावडर आणि रसायनाचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
भेसळीत राष्ट्रवादीच्या नेत्याचा हात
विशेष म्हणजे हा गोरखधंदा राष्ट्रवादीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकचं खळबळ उडाली आहे. या कारवाईत 132 पांढऱ्या गोण्या पावडर व पत्र्याचे 220 डब्बे रसायन असा 8 लाख 91 हजार 375 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
एकास अटक
दरम्यान याप्रकरणी जगदंबा मिल्क ऍण्ड मिल्कसचे मालक तथा राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सतीश नागनाथ शिंदे यांच्यासह अन्य एकावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिसांनी नंदू मेमाणे याला अटक केली आहे. सतीश शिंदेचा पाेलिस शाेध घेताहेत.
दरम्यान सतीश शिंदे हे पावडर आणि रसायनापासून दूध बनवून ते पुणे येथे विकत असल्याची माहिती अन्न प्रशासनाचे सह आयुक्त इम्रान हाश्मी यांनी फोनवरून दिली.
No comments:
Post a Comment