पुणे (प्रतिनिधी) : धूलिवंदन खेळून हातपाय धुण्यासाठी इंद्रायणीकाठी गेलेल्या एकवीस वर्षीय युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. जयदीप पुरुषोत्तम पाटील असे या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो जळगाव येथील रहिवाशी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील आठ विद्यार्थी धूलिवंदन खेळले. त्यानंतर सर्वजण वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेले. दरम्यान जयदीप पाटील याचा पाय घसरला आणि तो नदीपात्रात पडून खोल पाण्यात बुडाला.
या घटनेनंतर जयदीपच्या मित्रांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रणजित सावंत आंनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
दोन तासाच्या अथक शोधमोहिमेनंतर बुडालेल्या जयदीपचा मृतदेह सापडला. बचाव पथकाने बोटीच्या साहाय्याने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. याप्रकरणी अधिक तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.
No comments:
Post a Comment