बारामती (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या मागील 5 वर्षांच्या कार्यकाळातील कामकाजाच्या ‘ओंजळ’ या अहवालाचे आज विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्यासह माजी मंत्री धनंजय मुंडे व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
काटेवाडी या पवारांच्या मूळ गावी जाऊन धनंजय मुंडे यांनी विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांचीही भेट घेतली. परळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळातील कामकाजाच्या ‘ओंजळ’ या कार्यअहवालाचे प्रकाशन अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रतिवर्षी धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेते दीपावली निमित्त शरद पवार व अजितदादा पवार यांची गोविंद बाग येथे भेट घेत असतात. त्याच परंपरेचा भाग म्हणून धनंजय मुंडे यांनी आज भेट घेतली. यावेळी बीड जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, परतीच्या पावसाने झालेले नुकसान यांसह अनेक विषयांवर खा. शरद पवार यांच्याशी चर्चा झाली.
यावेळी आ. विक्रम काळे, माजी आ.संजय भाऊ दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष अशोक डक, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, चंदूलाल बियाणी, विजय भोयटे, जयराज देशमुख, जितेंद्र नव्हाडे, रविराज तावरे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment