Friday, October 21, 2022

बीड जिल्ह्यातील आजी-माजी लोक प्रतिनिधींनी खरीप २०२० चा पिकविमा कंपनी बरोबर तडजोडीमुळे शेतकऱ्यांना वाटप केला जात नाही - वसंत मुंडे

 ‌         
* अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांची चालु कर्ज माफ करा.   
    
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर खरीपा ला पाऊस झालेला असून त्यामध्ये विदर्भ मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यावर बोगस बियाणे मुळे  शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करावी लागल्याचा आरोप ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाचे २०२० चा पिक विमा देण्याचे आदेश असूनही आजतागायत  शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्याचे कारण बीड जिल्ह्यातील आजी माझी लोकप्रतिनिधींनी पिक विमा कंपनी बरोबर तडजोड केल्यामुळे बीडच्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्या पैसे देण्यास तयार नाहीत असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे .  
बीड पॅटर्न अंतर्गत खरीप २०२१ चा पिक विमा फक्त २५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला असुन उर्वरत पिक विमा रक्कम शासना कडून जमा केलेला नाही तरी तात्काळ जमा करावी , चालू खरीप २०२२ चा पिक विम्यासाठी एनडीआरएफ व एसडीआरएफ चे निकष न लावता तात्काळ बीड पॅटर्न अंतर्गत २५ टक्के रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश शासनाने देण्यात यावेत व अतिवृष्टी मध्ये झालेल्या शेतकऱ्यांचे सर्व पिकाचे नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात नियमानुसार वर्ग करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे मुख्यमंत्री कडे निवेदनाद्वारे केली .

No comments:

Post a Comment