Thursday, October 20, 2022

सौ.के.एस.के.महाविद्यालयाचे घवघवीत यश लावणी युवक महोत्सवात सतत चौथ्यांदा प्रथम. सहचार पारितोषिके.

बीड(प्रतिनिधी)ः येथील सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ केंद्रीय युवक महोत्सवात पाच पारिताषिके पटकावली आहे. तर लावणी या कला प्रकारात सतत चार वेळा येण्याचा मान पटकावला आहे.शिवाय लोकनाट्य द्वितीय,समुहनृत्य द्वितीय,तालवाद्य तृतीय, व एकांकिका तृतीय आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिनांक 16 ते 19 ऑक्टोंबर दरम्यान केंद्रीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सौ.के.एस.के.महाविद्यालयाने सर्वच कलाप्रकारात सहभाग नोंदवला होता.नुकत्याच झालेल्या पारितोषिक समारंभात महाविद्यालयाच्या अनामिका आहिरे हिच्या लावणीला प्रथम पारितोषिक प्रसिध्द अभिनेता भारत  गणेशपुरे व सुहास शिरसाठ यांचे हस्ते देण्यात आले.लोकनाट्य द्वितीय,समूह नृत्य द्वितीय,एकांकिका तृतीय, तालवाद्यत तृतीय हरीनाम बोचरे यांना  मा.कुलगुरू प्रमोद येवले, प्र-कुलगुरू शाम शिरसाठ,कुलसचिव भगवान साखळे यांच्या उपस्थितीत पारितोषिके देण्यात आली.
या सर्व कला प्रकारात अजित चव्हाण,किशोर गायकवाड,रोहन गडसिंह, सागर झुंगे,राहूल गोत्राळ,रूपाजी वाघीरे, सरिता ठोके,अनिकेत वाघमारे, सिध्देशवर सुर्यवंशी, श्रेया सरकटे,परमेश्वर पडूळे,सुमीत गायकवाड,किशोर गायकवाड,चव्हाण शितल,राऊत प्रतिक्षा, पाटील श्वेता, माने शैला,पारवे मोनिका, जोगदंड स्नेहल,सोनवणे अपूर्वा,पल्लवी दहिफळे,ठोके सरिता, पुजा कोटूळे, हरिनाम बोचले,शुभांगी मोरे, अनामिका अहिरे आदी विद्यार्थ्यांनी  पारितोषिके पटकावली आहेत.
या सर्वांना शाहीर विलास बापू सोनवणे,नितीन प्रधान,प्रा.दीपक जमधाडे,प्रा.सुरेश थोरात, विजय राख, लक्ष्मीकांत दोडके,उदय पोपळे,पवन शिंदे आदींचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेचे आधारस्तंभ माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, संस्थेचे सचिव मा.डॉ.भारतभूषण क्षीरसागर, प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर, योगेश भैय्या क्षीरसागर तसेच  महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.व्ही.क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर,उपप्राचार्य डॉ.शिवाजी शिंदे, पदव्युत्तर पदवी विभागाचे संचालक डॉ.सतीश माऊलगे, कमवि उपप्राचार्य सय्यद एल.एन.,पर्यवेक्षक प्रा.जालिंदर कोळेकर,डॉ.दुष्यंता रामटेके,डॉ.सुरेखा जोशी,कार्यालयीन अधिक्षक डॉ.विश्वांभर देशमाने  तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment