आज देशात लम्पी स्कीन डीसीस या आजारामुळे जनावरे दगावत आहेत. देशासह राज्यात या आजारासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरु असल्या तरी जनावरे दगावण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात लम्पी स्कीनचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली असली तरी या रोगाचा प्रसार होत असल्याचे दिसून येत आहे.
बीडमध्ये शेकडो गावात या आजाराचा प्रसार झाला आहे. तर 17 जनावरे दगावल्याची माहिती आहे. बीड जिल्ह्यातील शेकडो जनावरे लम्पीच्या विळख्यात सापडले आहेत. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील 126 गावातील 606 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. तर 441 जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत. त्यापैकी 17 जनावरांचा मृत्यू झाला असून 149 जनावरे उपचाराखाली आहेत. यातील मृत जनावरांच्या भरपाईपोटी 3 पशुपालक शेतकऱ्यांना आतापर्यंत शासनाने मदत केली असल्याचे समोर आले आहे. तर अणखी 10 प्रस्थाव शासन मदतीसाठी दाखल करण्यात आले असून यावर जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.
लम्पिच्या पार्श्वभूमीवर 4 लाख 95 हजार 500 लस उपलब्ध झाल्या होत्या.अद्यापही लसीकरण सुरूच असून 11हजार 4लस मात्र सध्या शिल्कक असल्याचे सांगण्यात आले आहे. लम्पी आजाराची व्यप्ती लक्ष्यात घेता या अधिक जिल्ह्यातील जनावरांच्या बाजारावर तसेच जनावरे वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे तसेच पशुपालकानीं जनावरांची काळजी घेण्याची आव्हानही जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे. याबाबत पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वारंवार आढावा बैठका घेत असल्याचे दिसून येत आहेत. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या धसवाडीत गेल्या महिनाभरापूर्वी जनावरांमध्ये आढळणाऱ्या लम्पी या संसर्गजन्य आजाराने बाधित दोन जनावरे आढळले होते. यानंतर जिल्ह्यात हळूहळू सर्वच तालुक्यांत लम्पी आजाराचा संसर्ग झाला. याचा प्रसार आता वाढू लागला असून अनेक जनावरे लम्पीच्या विळख्यात सापडली आहेत. यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 126 गावांत लम्पीचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत 606 जनावरे यामुळे बाधित झाले आहे. उपचारानंतर 441 जनावरे पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 149 जनावरांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, यातील 96 जनावरांमध्ये सौम्य लक्षणे आहेत, 16 जनावरांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत तर 9 जनावरांची स्थिती गंभीर आहे.
No comments:
Post a Comment