बीड : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असून त्यांचा शिवसेनेशी कसलाही संबंध नसल्याचे बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.
आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हा संपर्क प्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, आप्पासाहेब जाधव, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, दिलीप गोरे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांनी सांगितले की, जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाच्या संपर्कात नव्हते. त्यांनी पक्षात येऊन पक्षाचा कसलाही फायदा केला नाही तर त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला. आघाडी सरकारच्या काळात मंजूर करून घेतलेल्या 70 कोटीच्या कामाचा शुभारंभ शिंदे-फडणवीस यांच्या हस्ते केली. त्यांची मागील काही दिवसातील भूमिका लक्षात घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार जयदत्त क्षीरसागर यांचा पक्षाशी कसलाही संबंध नसल्याचे जाहीर करण्यात आले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment