परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- संस्कार प्राथमिक शाळा विद्यानगर येथे आज दि.१५ ऑक्टोबर २०२२ शुक्रवार रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.हा दिवस शाळेत वाचनप्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपक तांदळे सर, तर अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक सरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री . दिपक तांदळे सर यांनी आपले विचार व्यक्त केले त्यांनी आपल्या विचारात विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांनीही आपले विचार व्यक्त केले.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment