Thursday, October 13, 2022
परळी तालुक्यातील 80 ग्रा.पं.च्या मतदार याद्या प्रसिद्ध 18 ऑक्टोबर पर्यंत दावे हरकती व 21 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार अंतिम यादी.
परळी वैजनाथ (प्रतिनीधी) ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपलेल्या परळी तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार यादी कार्यक्रम जाहिर झाला असुन दि.13 ते 18 ऑक्टोबर दरम्यान दावे,हरकती स्वीकारण्यात येणार असुन दि.21 ऑक्टोबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
कोरोना व इतर कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या.गावच्या विकासाची महत्वपुर्ण जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असुन निवडणुक आयोगाने ग्रामपंचायत प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहिर केला आहे.यात परळी तालुक्यातील 80 ग्रामपंचायती आहेत.या ग्रामपंचायतींच्या प्रभानिहाय मतदार याद्या 31 मे 2022 रोजी विधानसभेची मतदार यादीनुसार अंतिम करण्यात येणार आहेत.यात लेखनिकांच्या चुका,दुसर्या प्रभागात चुकुन अंतर्भूत झालेले नाव,विधानसभा मतदार यादीत संबंधीत प्रभागातील मतदारांची नावे असुनही ग्रामपंचायतच्या संबंधीत प्रभागाच्या मतदार यादीत नावे वगळली असल्याची दावे,हरकती स्विकारल्या जाणार असुन हे दावे हरकती दि.18 ऑक्टोबर पर्यंत स्विकारले जाणार आहेत व दि. 21 ऑक्टोबर रोजी अंतीम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार परळी यांनी दिली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment