Friday, October 14, 2022

शैक्षणिक वर्षातील दिवाळी सुट्ट्या कमी करण्याचे आदेश रद्द करावेत -मुप्टा संघटनेची मागणी.


बीड (प्रतिनिधी) शैक्षणिक वर्षातील दीपावली सुट्टी शिक्षणाधिकारी बीड यांनी दिनांक 17. 10. 2022 ते दिनांक 7 .11. 2022 या कालावधीत दिपावली सुट्टी संदर्भ आदेश जा.क्र./जि. प. बीड/शि.वि.भां कावि/445/2022जाक्र.3340 दि. 15 /09/2022.नुसार निर्गमित केले होते. 

त्यानुसार सर्व शिक्षक, यांनी सुट्ट्यांचे आपापले नियोजन केलेले आहे. परंतू समाज माध्यमातून मा.शिक्षण उपसंचालक औरंगाबाद , विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय औरंगाबाद यांचे पत्र निदर्शनास आले आहे. त्या नुसार दिपावलीचा सुधारीत कालावधी दि. 22.10.2022 ते 09.10.2022 असा दर्शविला आहे. 
पूर्वी निर्गमित आदेशानुसार शिक्षक बांधवांनी सुट्टीचे नियोजन केले होते. 23/ 10/2022 तारखेपासून दिपावली असल्या कारणाने ऐनवेळी धावपळ होऊन दुर गावी जाणाऱ्या शिक्षकांचे नियोजन कोलमडू शकते. 
करिता शिक्षकांना आपल्या कुटुंबासह दिपावली साजरी करण्यासाठी पूर्वीचे सुट्टीचे आदेश कायम ठेवावेत. अशा मागणीचे निवेदन मुप्टा शिक्षक संघटनेचे ज्युनियर चे जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत जावळे, जिल्हा सचिव प्रा नारायण घोलप, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा संजय बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष बिभीषण चाटे, प्रा डॉ शहादेव डोंगर, प्रा. विनोद गलांडे, प्रा. नामदेव तरकसे, प्राध्यापक बसवेश्वर देशमाने ,श्री. रवींद्र बडे, प्रा.सुनील मोरे, प्रा. प्रशांत मळेकर,प्रा.अनिलजरे ,बिभीषण घायाळ, प्रा. घनश्याम चव्हाण, प्रा. आत्माराम झिंजुर्डे ,प्रा. महादेव हंगे ,प्रा. गायकवाड दत्ता, प्रा. अशोक ईनकर, प्रा. हनुमंत घायाळ, प्रा. अंकुश गव्हाणे, आदींनी केली आहे.

No comments:

Post a Comment