Monday, October 10, 2022

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचे परळी शहरात पुष्पवृष्टीने स्वागत.

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी विजयादशमी निमित्त सघोष पथसंचलन काढण्यात आले होते,हे संचलन शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आले, यावेळी विविध ठिकाणी नागरीक, व्यापारी यांच्या तर्फे पुष्पवृष्टी करून संचलनाचे स्वागत करण्यात आले. 
                  संघाच्या उत्सवांनपैकी विजयादशमी हा एक महत्त्वाचा उत्सव आहे, यामधून प्रतिवर्षी संघातर्फे शक्तिप्रदर्शन करण्यात येते. 
यावर्षी शहरातील अनेक नागरिक, व्यापारी स्वयंस्फूर्तीने या उत्सवात सहभागी झाले होते
संचलनासाठी संघातर्फे विविध ठिकाणी चोख असे नियोजन करण्यात आले होते.यावेळी पोलीस प्रशासनातर्फे ही विविध ठिकाणी मुख्य मार्गावर बंदोबस्त करण्यात आला होता

No comments:

Post a Comment