बीड (प्रतीनीधी) पेठ बीड भागातील ऑल इंडिया पॅंथर सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड.धम्मानंद वाघमारे यांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला.
धम्मानंद वाघमारे यांनी बोलताना असे सांगितले योगेश क्षीरसागर यांना नगराध्यक्ष बनवीण्या करीता रक्ताच पाणी करु.
धम्मानंद वाघमारे यांचे प्रभाग क्रमांक 4 व 19 मध्ये चांगल्या प्रकारे मताधिक्य आहे मताच्या बळावर या प्रभागातील चारही नगरसेवक नीवडुण आणण्याचा शब्द त्यांनी डॉ योगेश क्षीरसागर यांना दीला
याप्रसंगी त्यांचे स्वागत डॉ.योगेश क्षीरसागर यांनी करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलतांना सांगितले की, ॲड.धम्मानंद वाघमारे यांचे मी या विस्तारित परिवारात स्वागत करतो. यापुढे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहत त्यांच्या माध्यमातून आलेले समाजप्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असेल. विकास प्रक्रियेत चळवळीतील व सुशिक्षित तरुणांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. पेठ बीड भागात माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत. तरी आगामी काळात विविध विकास कामे करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची व आपल्या ताकदीची गरज आहे. पेठ बीड भागातील जो काही विकासाचा अनुशेष राहिला आहे तो भरून काढण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेल असे सांगितले.
यावेळी तालुका दूध संघाचे विलास (बापू) बडगे, नगरसेवक गणेश वाघमारे, भीमराव वाघचौरे, ॲड.विकास जोगदंड, मंगेश जोगदंड, सखाराम मस्के, नाना मस्के, कपिल सोनवणे, महादेव वाघमारे, मिलिंद हराळे, अनिल गोरे, गणेश हातागळे, रितेश डोंगरे, राजू काकडे, विक्रम जाधव यांच्यासह ॲड.वाघमारे यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.
No comments:
Post a Comment