Tuesday, June 7, 2022

बीड शहरात अभूतपूर्व शिवराज्याभिषेक दिन साजरा.सर्व जाती धर्मातील १०१ जोडप्यांकडून राज्याअभिषेक सोहळा संपन्न .

 

बीड  (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांचा 348 वा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. बीड शहरात देखील अभूतपूर्व असा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात व आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थ) येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवराज्याभिषेक समिती बीड शहर वतीने सामूहिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात कुठेही असा दिमाखदार सोहळा बीड मध्ये पार पडला.

गेली दोन वर्ष कोरोना च्या निर्बंधामुळे हा सोहळा झाला नव्हता. मात्र आता निर्बंध हटवले यामुळे महाराष्ट्रासह बीड शहरात देखील शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व समाजातील 101 जोडप्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या 101 मूर्तींचा मंत्र उच्चारत राज्याअभिषेक करण्यात आला. यावेळी जिजाऊ वंदना व राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उपस्थित नागरिकांना गोड पदार्थाचे व पाण्याची सोय समितीकडून करण्यात आली होती.

दोन वर्षानंतर शिवराज्याभिषेक दिन सोहळा होत असल्यामुळे बीड शहरातील सर्व जाती धर्माच्या नागरिक आणि महिला हा दिमाखदार सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.


पुढील वर्षी यापेक्षा भव्य दिव्य स्वरूपात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येईल असे शिवराज्याभिषेक बीड शहर समिती कडून सांगण्यात आले.

डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांनी सपत्नी छत्रपति शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा शिवराज्याभिषेक केला.

आपल्या बीड शहरात देखील प्रथमच 101 जोडप्यांसह हा शिवराज्याभिषेक आज संपन्न झाला. महाराजांनी अठरा-पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले.त्याच विचाराने या समितीने देखील सर्व समुहांना एकञ घेत हा दिन आज साजरी केला. या विचाराची आज खरी गरज असुन आम्ही देखील याच विचाराचे पाईक असल्याचे मत डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त करत शिवभक्तांना व बीड वासियांना शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या.शुभेच्छा दिल्या  .

No comments:

Post a Comment