बीड (प्रतिनिधी) ज्या मुलांचे आई-वडिलांचे छत्र हरवले आहे, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे,दोन वेळचे जेवण करणे शक्य नाही. अशा कुटुंबातील निराधार असलेल्या मुलांचे आणि जी मुले सामान्य नसून किन्नर आहेत त्यांचे संपूर्ण पालकत्व स्वीकारण्यात येणार आहे.अशा मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांना सामाजिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्या पालकांना किन्नर मुले आहेत अशा पालकांनी आपल्या किन्नर मुलांची आणि ज्या मुलांना कोणीही नाही अशा निराधार मुलांची 20 जून 2022 पर्यंत 7030149322 या मोबाईल नंबरवर आणि याच व्हाट्सअप नंबर वर नोंदणी करावी असे आवाहन दैनिक सूर्योदयच्या उपसंपादक तथा पत्रकार संघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष शेख आयेशा यांनी केले आहे.
दुर्दैवाने ज्या मुलांच्या डोक्यावरील आई वडिलांचे छत्र हरवले आहे. अशी निराधार मुले आणि किन्नर असलेल्या मुलांना शिक्षण अथवा समाजातील अपेक्षित असलेली कोणतीही प्रतिष्ठा मिळत नाही. त्यांच्या आयुष्यापुढे अनंत समस्या निर्माण होतात.या मूळ समस्येतून त्यांना सोडवण्याची आज खरी गरज आहे.किन्नर असलेली मुले आणि ज्या मुलांच्या डोक्यावरील आई वडिलांचे छत्र हरवले आहे, घरात अत्यंत गरीब परिस्थिती आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे ते पुढचे शिक्षण घेऊ शकणार नाहीत. अथवा त्यांचे बालपण हरवले जाईल, अशा मुलांचे संपूर्ण पालकत्व स्वीकारले जाणार आहे. ज्या मुलांचे वयोगट 5 ते 15 वर्ष आहे अशा महाराष्ट्रातील गोरगरीबातील निराधार आणि किन्नर असलेल्या बालकांचे शैक्षणिक सह संपूर्ण पालकत्व स्वीकारण्यात येणार आहे.अशा किन्नर मुलांना सर्व सुखसुविधा असलेल्या उच्चभ्रू शाळेमध्ये शिक्षण देण्यात येणार असून त्यांच्या राहण्याची, खाण्याची सर्व व्यवस्था देखील मोफत करण्यात येणार आहे. तेव्हा निराधार असलेली बालके आणि किन्नर असलेल्या बालकांना त्यांच्या नातेवाईक आप्तेष्ट अथवा पालकांनी त्यांना वार्यावर न सोडता 20 जून 2022 पूर्वी पत्रकार संघाच्या बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा दैनिक सूर्योदयचे उपसंपादक शेख आयेशा यांच्या व्हाट्सअप नंबर ७०३०१४९३२२ वर संपर्क साधून अशा गरजवंत मुलाची नोंद करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment