____
नियमबाह्य गर्भपात प्रकरणातील माताच्या मृत्युप्रकरणात अड.संगीता धसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळातील सदस्य सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,मोहम्मद मोईज्जोदीन,शेख मुबीन बीडकर ,शेख युनुस च-हाटकर,यांनी जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांची भेट घेऊन संबधित प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी
केल्यानंतर अखेर डाॅ.सुरेश साबळे यांनी ४ सदस्यांची समिती नेमली असुन डाॅ.संतोष शहाणे,वैद्यकीय अधिक्षक रायमोहा बीड,डाॅ.अभिषेक जाधव,वैद्यकीय आधिकारी जिल्हारूग्णालय बीड,डाॅ.राजश्री शिंदे वैद्यकीय आधिकारी जिल्हारूग्णालय बीड,श्री.प्रकाश सानप,कार्यालयीन अधीक्षक जिल्हारूग्णालय बीड यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सविस्तर माहीतीस्तव
______
बीड जिल्हारूग्णालयात नियमबाह्य गर्भपातामुळे मृत्युमुखी पडलेल्या ३ मुलीच्या सीताबाई गणेश गाडे वय ३० वर्षे रा.बक्करवाडी ता. बीड यांच्यामुळे बीड जिल्ह्य़ातील मुलीचे लिंगनिदान करणे व मुलाच्या हव्यासापोटी मुलीचा गर्भपात करण्याचे पातक केवळ पैशासाठी काही वैद्यकीय व्यावसायाला काळिमा फासणा-या निष्ठुर लोकांकडुन होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज असून ३ मुलींची आई असलेल्या सीताबाई यांची ४ थ्यांदा गर्भचाचणी कुठे केली?? कोणत्या दवाखान्यात केली ? गर्भाशयाची पिशवी फाटुन अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यु झाल्याचे वैद्यकीय तज्ञांनी शवविच्छेदन केल्यानंतर नमुद केले असून संबधित प्रकरणात जर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या असतील तर कोणत्या मेडीकल मधुन घेतल्या आदिंची चौकशी करण्याची गरज असून संबधित प्रकरणात सखोल चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली होती.
प्रसारमाध्यमांचे यश:-डाॅ.गणेश ढवळे
____
नियमबाह्य गर्भपात प्रकरणातील मातेच्या मृत्युप्रकरणात विविध प्रसारमाध्यमांतून आवाज उठवल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून ४ सदस्यीय समितीची स्थापना करून त्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सुतोवाच डाॅ.सुरेश साबळे यांनी केले आहे,त्यामुळेच प्रसारमाध्यमांने सामाजिक कार्यकर्ते यांच्या आवाजाला बळ दिले असून प्रसारमाध्यमांचेच यश आहे.
No comments:
Post a Comment