परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची दि.3/5/2022 रोजी जयंती आहे. हा जयंती उत्सव सर्वांनी उत्साहात साजरा करावा असे आवाहन लिंगायत संघर्ष समितीचे बीड जिल्हा संघटक आत्मलिंग शेटे यांनी केले आहे.
अक्षया तृतीया दि.3/5/2022 रोजी शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र.ज.पु.ती.2200 प्र.क्र.89/29 दि.12/4/2001 नुसार, मंत्रालय मुंबई 15 डिसेंबर 2020 अन्वये या परिपत्रकानुसार सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयात सामाजिक क्रांतीचे जगत्जेते महात्मा बसवेश्वर यांची जयंती सर्वांनी साजरी करण्यात यावी असे महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढलेले आहे तरी याचे सर्वांनी पालन करावे व सर्व कार्यालयात जयंती उत्सव साजरा करावा असे आवाहन आत्मलिंग शेटे यांनी केले आहे.
जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर हे लिंगायत धर्माचे आद्य संस्थापक आहेत. भारताच्या, धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील महनीय असे समाज परिवर्तनवादी युगपुरूष म्हणून संपूर्ण भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा महात्मा बसवेश्वरांचे आदराने नाव घेतले जाते. बसवण्णाने 12 व्या शतकाच्या सुरवातीलाच जातीयवादी शक्ती विरोधात लढा उभारला होता. महात्मा बसवेश्वर हे पहिले क्रांतीकारी, धर्मविचारक होते, महिलांना मुक्तीचे पंख देणारे भारतातील समतेचे जनक होते. आशा वीरपुरूशाला त्यांच्या उद्बोधक कार्यामुळे त्यांना महात्मा बसवेश्वर विश्वगुरू, विश्वविभुती, भक्ती भंडारी, क्रांतीकारी महामानव, वचनकार अशा विविध पदव्या मिळाल्या आहेत. अशा या जगत्ज्योती बसवेश्वरांची जयंतीमध्ये सर्व लिंगायत बांधव व बसव भक्तांनी उत्साहात सहभागी होऊन जयंती साजरी करावी असे आवाहन लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक काकासाहेब कोयटे, अध्यक्ष सुनिल रुकारी, उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे, मराठवाडा अध्यक्ष उदयकुमार चौंडा तसेच विरशैव सभेचे बीड जिल्हाध्यक्ष दत्ताप्पा इटके गुरूजी, लिंगायत संघर्ष समितीचे जिल्हा संघटक आत्मलिंग शेटे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment