गद्दारांना क्षमा नाही… शिवसेनेचे ज्वलंत विचार अंगीकृत करून , हिंदू धर्माच्या रक्षणार्थ धर्मवीर आनंदजी दिघे यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले . यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा बहुचर्चीत चित्रपट सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे . या चित्रपटच्या शो चे तीन दिवस मोफत आयोजन बीड जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे .
शुक्रवार , शनिवार व रविवार दि २० , २१ , २२ मे या सलग तीन दिवस सायंकाळी ६ चा शो मोफत असेल . शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचाराने शिवसेना स्थापन केली , त्यांच्या तालमीत तयार केलेले शिवसैनिक , व लाखात एक तयार झालेला धर्मवीर आनंदजी दिघे आजच्या शिवसैनिकांना समजावेत , अनुभवता यावेत म्हणून या मोफत शो चे आयोजन केले असल्याचे अनिल जगताप यांनी सांगितले .
धर्मवीर चित्रपटा च्या मोफत तिकीट साठी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी . शिवसैनिक व शिवसेनेवर प्रेम असणाऱ्या तमाम जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे
No comments:
Post a Comment